पत्रकारांवर हल्ला केल्यास माफ करणार नाही
महाड (रायगड) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची महाड तालुक्याची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष योगेश भामरे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी .टी. आंबेगावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, कोकण विभाग योगेश भामरे व कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार यांच्या उपस्थितीत महाड तालुक्याची नव्याने कार्यकारणी तयार करण्यात आली.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाड तालुकाध्यक्षपदी किशोर किर्वे, तालुका उपाध्यक्ष संजय पवार, महाड तालुका सचिव स्वप्नील ढवण, सहसचिव श्रीकांत गायकवाड, महाड तालुका कार्याध्यक्ष इस्माईल मापकर, तालुका खजिनदार रेश्मा माने, तालुका संघटक संदेश चौधरी, तालुका सहसंघटक राकेश देशमुख, तालुका सदस्य प्रतिक पलंगे, यांच्यासह पत्रकार विवेक चाफेकर व अभिजीत ढाणीपकर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित महाड तालुकाध्यक्ष किशोर किर्वे म्हणाले की, पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला माफ करणार नाही. या संघामध्ये सहभागी झालेल्या पत्रकारांना घाबरायचे कारण नाही संघटना वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे, आपल्या लेखणीचा योग्य वापर करून गोरगरिबांच्या भल्यासाठी निर्भीड बातम्या लिहावे. कोणालाही न घाबरता लिखाण करत जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाड तालुका पदाधिकाऱ्यांचे राज्य पदाधिकारी, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, संघटक संजय लांडगे, कोकण विभाग उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा जनसंपर्क प्रमुख सागर पवार, रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. रत्नाकर पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय दळवी, जिल्हा संघटक प्रसाद गोरेगावकर,जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले