वर्धा: सोने खरेदीसाठी रंगराव नवगिरे हे परभणी वरुन अमरावतीला जात असताना, वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा येथे जेवण करण्यासाठी थांबले होते. त्यावेळेस त्यांच्या गाडीतील 2 लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली होती.
त्यांनी या प्रकारची तक्रार कारंजा ग्रामीण पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत अवघ्या सहा तासात मुद्देमाल हस्तगत करीत आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे वृद्ध दांपत्य आपल्या चारचाकी गाडीने सोने खरेदी साठी अमरावतीला जात होते.

दरम्यान, खेर्डा फाट्यावर गाडी लावून जेवण करण्यासाठी गेले असता गुराखी सुधाकर कांबळे यांनी याचा फायदा घेत बॅग पळविली,मात्र पोलिसांनी चोरीचा लवकरच छडा लावून दोन लाख रुपये या वृद्ध दांपत्यास परत केले. त्यामुळं वृद्ध दांपत्याने कारंजा ग्रामीण पोलिसांचे आभार मानले.