उरण (दिप्ती पाटील) :–न्हावा शेवा पोलीस स्टेशन आयोजित हळदीकुंकू समारंभ दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी उरण येथील न्हावा शेवा पोलीस स्टेशन मध्ये संपन्न झाला. न्हावा शेवा पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने व पोलीस हवालदार सौ. मानसी तांबोळी यांच्या नियोजनाखाली आज सायंकाळी ५ वाजता न्हावा शेवा पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार सौ मानसी तांबोळी व सौ. सीमा घरत यांनी श्री गणेश लक्ष्मीच्या प्रतिमेचे पुजन करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर भटे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून हळदीकुंकू समारंभाला सुरवात झाली. हळदीकुंकू समारंभाच्या सुरवातीलाच भारतरत्न, गाणकोकीळा, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहुन समारंभाची सुरवात झाली.उरण तालुक्यातील विविध पक्षाच्या राजकीय कार्यरत्या ,प्रतिष्ठीत महिला, समाजसेविका, सरपंच ,पत्रकार, अशा विविध क्षेत्रातील महिला भगीनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या.सामाजिक कार्यकर्त्या सौ. सीमाताई घरत, सौ. गौरी देशपांडे, सौ. हेमलता पाटील यांनी थोडक्यात आपापले मनोगत व्यक्त केले. पोलीस हवालदार सौ. मानसी तांबोळी यांनी सर्व महिला भगिनींना हळदीकुंकू लावले. मपोहवा रोहिणी जाधव , देवयानी घरत, कनिष्का नाईक, यांनी खायचे पान, तीळगूळ, गुलाब फुल दिले. तसेच पोलीस हवालदार मानसी तांबोळी यांच्या हस्ते मीठाई आणि भेटवस्तू देण्यासाठी मपोशी जेनिफर जयाराज, स्वाती देशमुख, सुवर्णा भोईर, मयुरी ओव्हाळ, रेणुका शिंदे, किरण टिकेकर, सीमा डोंगरे, लता रजपूत, नीता डाऊर यांनी मदत केली. या कार्यक्रमात एक चिठ्ठी खेळ खेळण्यात आला. त्यात सर्व महिलांची नावे टाकून एक छोट्या मुलीच्या हस्ते चिठ्ठी सोडत काढण्यात आली. त्यात नववधू सौ. मनाली घरत हिच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे नववधू मनाली घरत ह्या सुवासिनीची साडी चोळी देऊन ओटी भरण्यात आली. या कार्यक्रमा साठी सौ. सीमा घरत, सौ. गौरी देशपांडे, सौ. नायदा ठाकूर, सौ. लीना पाटील, सौ. हेमलता पाटील, सौ. अनिता घरत,सौ. तुप्ती भोईर, सौ. सुजाता कडु, अफशा मुकरी,सौ. नयना पाटील, सौ. रंजनाताई तांडेल, सौ. संगिता पवार, समिया बुबेरे, सौ. कल्यानी दुखेडे आणि पत्रकार दिप्ती पाटील सह तालुक्यातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्त्रोत : स्वतः दिप्ती पाटील