माहिती अधिकारात पहिले अपील दाखल
कर्जत ( प्रतिनिधी) जयेश जाधव
कर्जत तालुक्यातील सर्वात श्रीमंत व सुसज्ज इमारतीत नावारूपाला उभी राहिलेली सर्वाधिक उत्पन्न असलेली नेरळ ग्रामपंचायत आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे लाखो रुपयांची विकासकामे व निधी कागदोपत्रीच दाखवून कागदी घोडे नाचवत रस्ते ,गटारे याची अर्धवट व निकृष्ट दर्जाची कामे करून लाखोंची खोटी बिले आॅडिट स्ट्रक्चरल न करता ग्रामपंचायतीच्या संगनमताने ठेकेदाराने आर्थिक मलिदा खाल्ला असल्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा राक्षस घुसला असल्याकारणाने नागरिकांना ग्रामपंचायतीमधील अकार्यक्षम ग्रामसेवक माहितीच्या अधिकारात मागविलेली माहितीची लपवाछपवी करून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक नसल्यामुळे विकास कामांच्या नावाखाली बोंबाबोंब सुरू असून ग्रामपंचायतीच्या सरपंच ,सदस्य, ग्रामसेवक हे नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी व माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी वेळोवेळी नेरळ ग्रामपंचायतीत विकासकामे व त्यावर होणारा खर्च, आॅडिट स्ट्रक्चरल,अनधिकृत टपरीधारक,यांची माहिती मिळावी म्हणून माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असताना देखील दिली जात नाही.माहिती का दिली जात नाही??? माहिती अधिकारात भ्रष्टाचार बाहेर येईल या भितीपोटी आजपर्यंत या ग्रामपंचायत माहिती देण्यात कसूर करीत आहे कि काय? अशी चर्चा तालुक्यात होत आहे. नेरळ ग्रामपंचायतीत आलेला निधी , मंजूर झालेले कामे प्रत्यक्षात झालेली कामे , विकासकामांवर झालेला खर्च आॅडिट याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते जयेश जाधव यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली असताना देखील एक महिना लोटला तरी माहिती देण्यास टाळाटाळ व लपवाछपवी करीत असल्याने श्री जाधव यांनी नाइलाजाने कर्जत पंचायत समितीत प्रथम अपील दाखल केले आहे त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नेरळ ग्रामपंचायतीत पाच ते सहा वर्षांत कोरोडो रुपयांची विविध कामांसाठी निधी मंजूर होऊन हि कामे प्रत्यक्षात झालेली नाही जी झालेली कामे ती देखील निकृष्ट दर्जाची व अर्धवट अवस्थेत असताना देखील कागदोपत्री दाखवून कागदी घोडे नाचवत बेकायदा खर्च आॅडिट न करता सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने लाखोंची खोटी बिलांची धनादेश काढून गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी अडचणीत येणार आहे त्यामुळे खर्चाचा तपशील माहिती व अन्य माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते जाधव यांनी केला आहे याशिवाय अनधिकृत टपरीधारक, यांच्याविरोधात ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध अकिल मुल्ला यांनी देखील वेळोवेळी नेरळ ग्रामपंचायतीत माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असताना त्यांना देण्यात आलेली नाही. प्रथम अपील अधिकारी ग्रामपंचायतीला पाठिशी घालत आहे त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये फार मोठे भ्रष्टाचाराचा गौडबंगाल असल्याचेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची शासनाने उच्च स्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी होत आहे.
प्रतिक्रिया:- नेरळ ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर झालेला खर्चाचा तपशील व वापरलेला निधी , स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती मागितली होती परंतु एक महिना उलटूनही माहिती न मिळाल्याने मी या विरोधात प्रथम अपील दाखल केले असून त्या अपिलावर लवकरच सुनावणी होणार आहे – जयेश जाधव, माहिती अधिकार कार्यकर्ते