नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापुरात 30 पेक्षा जास्त गव्यांचा वावर, शेतकऱ्यांना धडकी

प्रतिनिधी- विजय सनदी- कोल्हापूर : जिल्ह्यात पुन्हा एकदा गव्यांचा वावर दिसून येत आहे. पन्हाळा तालुक्यात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले आहे. 30 हून अधिक गवे दिसल्याने शेतकऱ्यांना धडकी बसली आहे. दरम्यान, काही गव्यांना जंगलाच्या दिशेने पिटाळण्यात काही ग्रामस्थांना यश आले आहे.

पन्हाळा तालुक्यात गव्यांचा कळपच दिसून आला. गव्यांचा वापर दिवसागणिक वाढत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या एका पाठोपाठ एक असे 30 हुन अधिक गव्यांचे दर्शन झाले. 

पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पन्हाळा तालुक्यातील वाघवे पैकी खोतवाडी या परिसरात गव्यांचा वावर दिसून येत आहे. राधानगरी- आजरा परिसरातील अभयारण्यात मोठ्या प्रमाणात गवे आहेत. अनेकवेळा त्यांचे कळपाने दर्शन होते. मात्र पन्हाळा तालुक्यात पहिल्यांदाच एव्हडे गवे एकाचवेळी दिसले आहेत. दरम्यान, यावेळी शेतीचे नुकसान होऊ नये, म्हणून ग्रामस्थांनी गव्यांना जंगलाच्या दिशेने उसकवून लावले.

दरम्यान, याआधी पुणे तसेत सांगली येथेही गवे दिसून आले होते.  मिरज तालुक्यातील धामणी, बामणी परिसरात गवा दिसून आला. त्यानंतर तत्काळ वनविभागाचे पथक घटनास्थळी धावले. पायांच्या ठशांवरून तो गवा असल्याचे समोर आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:07 pm, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!