प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – नवापूर तालुक्यातील पानबारा शासकीय माध्यमीक आश्रमशाळेतील लॅपटॉप चोरीचा गुन्हा अवघ्या ४८ तासात उघड करण्यात आला आहे . विसरवाडी पोलीस स्टेशन कडून चोरीस गेलेले एकुण २२ लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असुन मौज मजे साठी सोनखांब आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांनी चोरी केल्याचे उघड झाले .
या प्रकरणी लॅपटॉप खरेदी करणाऱ्या एकासह ५ विधीसंघर्ष बालकांना अटक करण्यात आली आहे .
अशी माहिती पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी दिली . याबाबत अधिक माहिती अशी कि , दि . १२ फेब्रुवारी रोजी शासकीय माध्यमीक आश्रमशाळा , पानवारा , ता . नवापुर येथील संगणक कक्ष असलेल्या खोलीचे मागील खिडकीला असलेले लोखंडी जाळीचे खिळे काढुन तसेच सदरची जाळी भिंतीतुन वेगळी करून खिडकी द्वारे आत प्रवेश करून संगणक कक्षातील लीनोवा कंपनीचे काळ्या रंगाचे वेगवेगळ्या मॉडेलचे प्रत्येकी किंमत १२ हजार असा २ लाख ६४ हजर रुपयाचे एकुण – २२ लॅपटॉप १२.३० ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने फिर्यादी प्रकाश परशराम वसावे यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता . शासकीय माध्यमीक आश्रमशाळा , पानबारा , ता . नवापुर , जि . नंदुरबार येथून मुलांच्या भवितव्यासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप कोणीतरी चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली .
सदरची बातमी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांना समजल्याने त्यांनी या बाबत अतिशय हळहळ व्यक्त करून गुन्हा उघडकीस आलाच पाहिजे असे ठरविले
● त्यांनी याबाबत अपर पोलीस अधिक्षक विजय पवार . उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याशी चर्चा करून विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गुन्हा उघडकीस आणण्या बाबत योग्य त्या सूचना देवून मार्गदर्शन केले . विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी त्यांचे अधिपत्याखाली असलेले पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणे व ४ अंमलदार यांचे तसेच स्वतःच्या नियंत्रणाखाली २ अंमलदार अशी २ पथके तयार केली .
सदर पथकांनी शासकीय आश्रम शाळेच्या आजूबाजुचा सर्व परिसर तसेच अभिलेखावर असलेले आरोपी तपासण्यास सुरुवात केली आजूबाजूचा परिसर तपासत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की सोनखांब येथील आश्रमशाळेच्या १० वी च्या वर्गातील एका विद्यार्थ्याकडे लेनोवा कंपनीचा लॅपटॉप आहे
. ● सदरची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे व त्यांचे पथक असे तातडीने सोनखांब रवाना झाले . तेथे पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणे यांनी सदर मुलास गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याच्या सोबतच्या ४ मित्रांसह शासकीय माध्यमीक आश्रम शाळा
●पानवारा येथून लॅपटॉप चोरी केले असल्याचे कबुली दिली . त्यांनी चोरी केलेले २१ लॅपटॉप काढून दिले व ते लॅपटॉप कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केले . तसेच चोरी केलेल्या लॅपटॉप पैकी १ लॅपटॉप हा त्यांनी धवल किरीटभाई प्रजापत रा . अवधुतवाडी , ता , नवापुर , यास ८ हजार रुपयात विकला असल्याचे सांगितले सदरचा लॅपटॉप देखील पोलीस पथकाने कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत केलेला आहे . तसेच सदर गुन्ह्यात चोरीची मालमत्ता विकत घेण्याबाबत भादंवि कलम ४११ ची वाढ करून चोरीचा लॅपटॉप विकत घेणारे धवल किरीटभाई प्रजापत यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे .
सदर ५ विधी संघर्ष ग्रस्त बालकांकडे पोलीस अधीक्षक पी . आर पाटील यांनी स्वतः विचारपुस केली असता
●. त्यांनी सदरचा गुन्हा हा मौज मजेसाठी केला असल्याचे सांगितले . सदर विधीसंघर्ष ग्रस्त बालकांना भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे कृत्य न करणे बाबत समज दिली . तसेच चोरीची मालमत्ता घेणाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही व त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील या सोबत दिला आहे . .
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील . अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि नितीन पाटील , पोउपनि भुषण बैसाणे , पोकॉ लिनेश पाडवी , चापोना राजु कोकणी , पोना अनिल राठोड , पोकॉ विपुल नाईक , पोकॉ पिंटु पावरा पोकॉअतुल पानपाटील , चापोकॉ विशाल गावित यांनी केली आहे .