प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – सुझलॉन टॉवरवर दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असणाऱ्या हट्टी येथील चौघांना नंदुरबार तालुका पोलीसांनी काळमदेव परिसरातून अटक केली दरम्यान एक जण फरार होण्यात यशस्वी झाला . त्यांच्या कडून एक एअर गन , तलवारसह साहित्य जप्त केले आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सुझलॉन कंपनीतर्फे २५० पवन चक्की बसवण्यात आलेल्या आहेत . सदर यांमधील केवल वायरच्या चोरीच्या वारंवार पडत होत्या . सदर चोऱ्या धुळे जिल्ह्यातील हट्टी खु . ता . साक्री गावातील टोळीकडून करण्यात येत होत्या व सदरची टोळी ही सुझलॉन कंपनीचे टॉवरसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना धाक दाखवून त्यामधील केबल चायरची चोरीकरणार आहेत . अशी माहिती मिळाली होती . पोलीस अधिक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दि . १४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी वेगवेगळे पथक तयार करुन काळमदेव मंदिराच्या पायथ्याशी दबा धरून बसले गुप्तबातमीनुसार एका मोटार सायकलवर चार इसम व एका मोटार सायकलवर एक असे काळमदेव मंदिराच्या पायथ्याजवळ आले असता त्यांना पोलीस पथकांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले यात संदिप गोरख सुर्यवंशी , मनोहर पोपट पदमोर , अधिकार रतन थोरात , राजेंद्र हिरामण .खताळ सर्व रा . हट्टी खू.ता. साक्री त्यातील संशयित आरोपी रोहिदास शिवाजी मासुळे रा .. हट्टी खू . ता . साक्री हा फरार झाला आहे . त्यांच्या ताब्यात एक एअर गन , एक लोखंडी तलवार आठ वेगवेगळ्या साईजचे लोखंडी पहाने एक मोठे लोखंडी कटर त्याला धारदार पाते , दोन लहान कटर , हेक्झा ब्लेड / करवत पट्टी , एक किलो मिरची पावडर असे साहित्य मिळुन आल्याने ते जप्त करून त्यांना साहित्यासह पोलीस स्टेशनला आणुन त्यांच्याविरुध्द पोकॉ गणेश भबुतरा सोलंकी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३ ९९ ४०२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ दाखल करण्यात आला आहे . यातील संशयित आरोपीतांवर नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्यातील निजामपुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत . सदरच्या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील सुझलॉन टॉवरवर होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले . सदरची कारवाई पोलीस अधिक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे , असई संजय मनोरे , पोहेकॉ ज्ञानेश्वर सामुद्रे , पोना ज्ञानेश्वर पाटील , पोना आनंद मोरे , पोना राजेंद्र धनगर , पोना विनायक सोनवणे पोकॉ गणेश सोलंकी , चालक पो.ना. महेंद्र सोनवणे , पोकॉ दिपक मालचे , पोकॉ सचिन सैंदाणे अशांनी केली आहे .
सुझलॉन टॉवरवर दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असणाऱ्या हट्टी येथील चौघांना पोलिसांनी पकडले त्यातील रोहिदास शिवाजी मासुळे याच्याविरुद्ध नंदूरबार पोलीस ठाण्यात कलम 379,379 , 399,402,379,399 तर निजामपूर पोलीस ठाण्यात 379,34,369 , 34,379 , 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . तर दुसरा संशयीत अधिकार रतन थोरात याच्याविरुद्ध नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात कलम 379 निजामपूर पोलीस ठाण्यात 379,379,379 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . तर तिसरा संशयीत राजेंद्र हिरामण खताळ याच्या विरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात 379 चा गुन्हा दाखल आहे .