प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
नंदुरबार -नवापूर तालुक्यात चिंचपाडा जंगलात अवैधपणे वृक्षतोड करून नांगरटी केल्या प्रकरणी दोघांना न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे . सहाय्यक वनसंरक्षक ( प्रादेशिक व वन्यजीव ) नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून दि . 8 फेब्रुवारी रोजी सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार , वनक्षेत्रपाल चिचपाडा , रेंज स्टाफ चिचपाडा , नंदुरबार सह कंपार्टमेंट नंबर 82 मध्ये गस्त घालीत असताना जंगलात अवैधपणे वृक्षतोड करून नांगरटी केलेली दिसली . या बाबत वनविभागाने दि . 10 फेब्रुवारी रोजी रेंज स्टाफ चिचपाडा , गस्ती पथक जंगलात गस्ती घालीत असताना वंत्या भरत नाईक , गणेश बोंदल्या गावीत रा.चीचलीपाडा ता . नवापूर हे दोन जण त्यांना दि . 11 फेब्रुवारी रोजी प्रथम वर्ग 1न्यायालय नवापूर यांच्यासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची वन कोठडी सुनावली . त्यानंतर त्यांची चौकशी केली करून दि . 14 फेब्रुवारी रोजी प्रथम वर्ग न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 फेब्रुवारी पर्यंत १५ दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे . सदर कारवाहीत धनंजय ग . पवार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक , के . एम . बडुरे वनपाल कामोद पी.एस.पाटील वनपाल खोलविहीर वनरक्षक तुषार नांद्रे , संजय बडगुजर , रामदास पावरा ,आशितोष पावरा , मनीषा जाधव कविता गावित दीपा कापडणे देवमन सूर्यवंशी पी टी खैरनार व गस्ती पथक शहादा मधील वनकर्मचारी वाहन चालक चमाऱ्या गावितरोपवन रखवालदार बाळा गावीत यांनी सहभाग भाग घेतला .
सदर कार्यवाही ही दि.वा. पगार वनसंरक्षक धुळे उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा कृष्णा भवर , उमेश वावरे , विभागीय वनअधिकारी यांच्या दक्षता , धुळे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .