प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
तळोदा.- शहरातील श्रेयस कॉलनी येथे बंद घराचा कडी – कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून सामान अस्तवस्त केला आहे . दरम्यान घर मालक हे पुणे येथे त्यांचा मुलांना भेटण्यासाठी गेल्यामुळे घरातून रक्कम अथवा ऐवज किती व काय चोरीस गेले आहे . याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही संबंधित मालक घरी पोहोचल्या नंतरच याबाबतची फिर्याद तळोदा पोलीस ठाण्यात दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे . तळोदा शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून बंद घरांना चोरटे लक्ष करीत आहेत . असाच प्रकार शहरातील श्रेयस कॉलनी येथे घडला असून येथील रहवासी पंढरीनाथ मराठे हे आपल्या मुलांना पुणे येथे भेटण्यासाठी गेल्याचे संधी साधून बंद घराला लक्ष करत सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटेचादरम्यान चोरट्याने त्यांच्या घरातील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केल्याचे घटना घडली . दरम्यान याबाबत परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली .
दुमजली असलेल्या या घरात फिरून त्यांनी कपाटे , लॉकर , पलंग आदी महत्वाच्या जागी ठेवलेले सामान व कागदोपत्रे अस्ताव्यस्त केल्याचे श्वानपथक व फॉरेन्सिक लॅब पथकाचा निदर्शनास आले . घरमालक हे पुणे येथे कामानिमित्त गेले असल्याने घडलेला प्रकार हा त्यांना तेथे फोन वरून कळविण्यात आला . पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी स्वान पथक व फॉरेन्सिक लॅब पथकाला याबाबत माहिती देऊन प्राचारण करून घेतले . श्वान पथकात पोलीस उपनिरीक्षक सुजित डांगरे , जमादार ठाकरे , पोलीस हवालदार दिलीप दिलीप गावित , वाहनचालक गिरासे , यांनी अँजेल या श्वानाच्या माध्यमातून तपास लावण्याचा प्रयत्न केला . चोरी झालेल्या घरातून स्वान हे श्रेयस कॉलनी मार्गे प्रल्हाद नगर कडूनशहादा रस्त्यावर येऊन थांबले त्यामुळे चोर नेमके कुठल्या दिशेने गेले असावेत याबाबत थांब पत्ता लागला नाही . तर फॉरेन्सिक लॅब पथकातील जमादार भाभड , पो.ना. रामोडे वाहनचालक पिंजारी यांनी घरात शिरून त्यांचे नमुने घेतले आहेत घर मालक रात्री उशिरा पोचून गुन्हा दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे .