नांदेड, हदगांव : इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर महाराष्ट्राच्या मातीच्या कणावर अठरापगड जाती घेऊन विश्वासाच्या बळावर स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव पार्वती हॉटेल /भोजनालय,हदगाव येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगांव तालुक्याच्या वतीने कोरोनाच्या काळात आपली व आपल्या परिवाराची परवा न करता वेळोवेळी जनतेला सतर्क करण्याचे काम करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन कोविड योद्धांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी हदगांव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, होमगार्ड गणेश गिरबिडे, शासकीय स्वस्तधान्य संघटना हदगांव तालुका सचिव मिलिंद खंदारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी बी. के. गिरटकर, वरिष्ठ पत्रकार शाम लाहोटी, सा. हदगांव ऐक्सप्रेसचे संपादक प्रा गजानन गिरी, .प्रा राजेश राऊत, पत्रकार गजानन सुकापुरे, पत्रकार सनसोळे, शेख युसूफ, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना देशमुख, रूपादेवी पाटील गोकर्णा शिंदे, सुभद्रा खंदारे, आदी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी यांचा संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यां कल्पना देशमुख यांनी आयोजकांचा सत्कार केला. या कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रा, राजेश राऊत तर आभार तालुका अध्यक्ष कैलास तलवारे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगांव तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मामीडवार, जिल्हा सरचिटणीस संदीप तुपकरी, हदगांव तालुका अध्यक्ष कैलास तलवारे, उपाध्यक्ष संतोष डवरे, सचिव सिद्धार्थ वाठोरे, सहसचिव तुषार कांबळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत भोरे, संघटक केदार दायमां, कोषाध्यक्ष संजय तोषनिवाल, सल्लागार प्रा. राजेश राऊत, प्रसिद्धी प्रमुख पंकज चव्हाण, सदस्य प्रकाश जाधव, भगवान शेळके, कुणाल दस्तुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.