नाद पथक, झांज पथक, लेझीम, शंक नाद व महापुरुषांची वेशभूषा ठरली सर्वांचे आकर्षण
लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा लातूर व श्री रवींद्रनाथ टागोर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम संघटनेच्या गांधी चौक,लातूर येथील कार्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. दुपारी दोन वाजता शाहू चौक येथून भव्य रॅलीस सुरुवात करण्यात आली. यामध्ये रथ, कलाधीराज नाद पथक, झांज पथक, लेझीम, शंक नाद आणि पारंपारिक वेशभूषेतील छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले अशा महापुरुषांच्या वेशभूषेतील आकर्षण हे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही रॅली शाहू चौकातून निघून शाहू महाराजांना अभिवादन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले आणि गंजगोलाई येथील माता अंबाबाईची आरती करून डॉ. आंबेडकर पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.त्यांनंतर छत्रपती शिवाजी चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
ही रॅली अतिशय शिस्तबद्ध आणि मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडली तसेच लातूरकरांनी चांगली दाद दिली.
ही शिवजयंती व रॅली यशस्वी करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डाॅ. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकट पन्हाळे, अजय सूर्यवंशी मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष शिंदे लहूकुमार, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे तसेच श्री रवींद्रनाथ टागोर विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.