शहादा -प्रतिनिधी- राहुल आगळे
————————————–
शासकीय माध्यमिक व उच्चमध्यमिक कन्या आश्रमशाळा मांडवी ता. धडगाव जिल्हा नंदूरबार येथील ५० विद्यार्थिनींनी आपल्या विविध मागण्यासंदर्भात सकाळी ६ वाजेपासून मांडवी ते तळोदा असा ६५ किलोमीटरचा पायपीट प्रवास करत आपल्या विविध मागण्यासंदर्भात प्रकल्प कार्यालय गाठले.व ठिय्या आंदोलन केले.त्यांच्या या आंदोलनाला एकलव्य आदीवासी संघटना तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ऍड.रुपसिंग वसावे यांनी पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर त्यांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात तळोदा येथील प्रकल्प अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या जवळ विद्यार्थिनी प्रतिनिधी व संघटना प्रतिनिधी यांनी चर्चा केली चर्चेमध्ये खालील मागाण्यांसंदर्भात तोडगा काढण्यावर भर देण्यात आली. त्यामध्ये प्रमुख मागणी प्राचार्य एस.आर.पावरा हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याकारणाने शाळेत गैरहजर होते. ते वेळेवर येत नाहीत. शाळेतील समस्या घेऊन गेलो तर बरोबर उत्तर देत नाहीत. तरी त्यांच्या जागी नवीन प्राचार्य मिळावेत.त्याचबरोबर डी. बी.टी. संदर्भात गेल्या वर्षी खात्यावर पैसे आले नव्हते आणि यावर्षीसुद्धा पैसे आले नाहीत. तरी पैसे आले नसल्यामुळे आम्हा विद्यार्थिनींना पुस्तके, वह्या ,तसेच शालेय उपयोगी साहित्य खरेदी करता आले नाही. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी लवकरात लवकर पैसे खात्यावर वर्ग करण्यात यावे. तसेच प्रत्येक विषयासाठी विषय शिक्षक मिळावेत गेल्या २ वर्षांपासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल,इतिहास ह्या विषयासाठी विषय शिक्षक नाहीत अशा अवस्थेत आता
१२ वीची परीक्षा आहे या परिस्थितीत आम्ही काय लिहावे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला .
या प्रश्नांना उत्तर देतांना आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यांच्या सोबत तळोदा तहसीलदार गिरीश वखारे ही हजर होते ते म्हणाले की , डी.बी.टी. बाबत लवकरच मार्ग काढण्यात येईल व खात्यावर पैसे वर्ग होणेबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. त्याचबरोबर विषय शिक्षकाबाबतच्या प्रश्नांविषयी ते म्हणाले की , आदीवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत बरीच पदे रिक्त आहेत शासनस्तरावरून भरती नाही पण रोजंदारी तत्वावर कायद्याच्या चाकोटीत राहून कर्मचारी भरती लवकरच करण्यात येईल असे सांगण्यात आले.
मांडवी ते तळोदा असा पायी प्रवास करत आलेल्या विद्यार्थिनींना रस्त्यात काही बरे वाईट झाले असते तर याचे परिणाम काय झाले असते याबाबत संघटना प्रतिनिधींना मैनाक घोष यांच्याकडून अवगत करण्यात आले.याबाबत विद्यार्थिनींना समजावून ही विद्यार्थिनींनी न ऐकल्यामुळे रस्त्यात काही अडचण येऊ नये म्हणून शाळेतील शिक्षक एस.जे.वळवी,पी. ए.वसावे,महेंद्र खैरे, अधीक्षक एल.जी.पावरा हे सुद्धा सोबतच पायपीट करत आले.
मुली पायपीट करत येत असल्याचे माहीत झाले. त्यानंतर विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी अर्ध्या रस्त्यावर मुलींची भेट घेतली व त्यांना पाठिंबा दर्शवत प्रकल्प अधिकारी यांना मुलींच्या मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष
ॲड. रुपसिंग वसावे,ॲड गणपत पाडवी, विनोद माळी, जयस, नंदुरबार जिल्हाध्यक्ष बबिता राहसे,अनिता पावरा, उर्वीशा राहसे,प्रिया पावरा,आधी उपस्थित होते. दरम्यान आदिवासी विकास मंत्री असणारे ॲड .के. सी.पाडवी यांच्या मतदार संघातच विद्यार्थीनीची समस्या सोडविण्यासाठी 65 किमी पायपीट करावी लागते ही दुर्दैवाची बाब आहे