प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने राबविलेल्या विशेष मोहिमेला ६७ बेपत्ता महिला व पुरुष शोधण्यात यश मिळाले आहे . पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून या कामाला वेग देण्यात आला आहे . पोलीस महासंचालक यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक १५ जानेवारी २०२२ ते दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ पावेतो पोलीस स्टेशन स्तरावर दाखल बेपत्ता बालके , महिला व पुरुष यांचा शोध घेण्याची विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेशीत केले होते . त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पोलीस स्टेशन स्तरावर एक अधिकारी व दोन अंमलदार यांचे विशेष पथक तयार करुन मोहिम राबवायच्या सूचना केल्या . जिल्ह्यातील १२ अधिकारी व २४ अंमलदार यांनी सक्रीय सहभाग नोंदविला आणि बेपत्ता बालके , महिला व पुरुष यांच्यापैकी १५ पुरुषकारी व २४ अंमलदार यांनी सक्रीय सहभाग नोंदविला आणि बेपत्ता बालके , महिला व पुरुष यांच्यापैकी १५ पुरुष व ५२ महिला शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश आले . नंदुरबार शहरातील ९ , नंदुरबार तालुक्यातील ६ , उपनगर ५ , विसरवाडी ६ नवापुर ८ , शहादा ९ , सारंगखेडा ६ , धडगाव १ , अक्कलकुवा ६ , तळोदा ६ व मोलगी ५ अशा बेपत्ता इसमांचा शोध घेण्यात विशेष पथकाला यश आले .पोलीस महासंचालक , महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील आदेशान्वये दिनांक १ जुन २०२१ पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आले आहे . नंदुरबार जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील मिसिंग डेस्कचे अंमलदार सहा . पोलीस उपनिरीक्षक भगवान धात्रक हे काम पहात आहेत . सदर कक्षाकडून बेपत्ता इसमांच्या नातेवाईकांना गावातीलपोलीस पाटील , ग्रामसेवक यांच्या संपर्कात राहून बेपत्ता बालक , महिला व पुरुष यांच्या मित्रांचा व इतर नातेवाईक यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन तांत्रिक विश्लेषण करुन बेपत्ता इसमांचा शोध घेतला जातो . सदर कक्षाच्या माध्यमातून सन २०२१ मध्ये ६६ महिला व बालके मिळून आले आहेत .
जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले की , बेपत्ता इसम हे जास्ती जास्त गरीब घरातील असल्याने ते कामाच्या शोधात कौटुंबिक वादामुळे गुजरात राज्य किंवा इतर ठिकाणी निघून जात असतात . अशा बेपत्ता इसमांचा शोध घेणेसाठी संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदारांना त्याठिकाणी पाठवून त्यांना तेथुन आणले जाते . कामानिमित्त घर सोडून गेलेल्या बालकांना पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले जाते व त्यांच्या शिक्षणासाठी पोलीस दलातर्फे मदत केली जाते . गुन्हे तपासा बरोबरच बेपत्ता बालके , महिला व पुरुष यांचा शोध घेण्याकरीता सचोटीने प्रयत्नकरण्याबाबत पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी आवाहन केले आहे . पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , स्थानिक गुन्हे शाखा यांच्य मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यता कक्षाच्या प्रभारी अधिकारी सहा . पोलीस निरीक्षक नयना देवरे , सहा.पो उप निरीक्षक भगवान धात्रक , स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकों सजन वाघ शोधकार्य करीत आहेत .