नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी १६ मार्च पर्यंत जीपीएस बसविणे बंधनकारक : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार – नंदूरबार जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतूकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी दि . १६ मार्च २०२२ पूर्वी जीपीएस बसविणे व महाखनिज प्रणाली सोबत संलग्न करणे बंधन कारक आहे . असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे . या पत्रात म्हटले आहे की , परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गती बाबत कार्य पध्दती निश्चित करण्यात आलेली आहे . त्या अनुषंगाने पर राज्यातून वाळू रेती वाहतूकी बाबत ” महाखनिज ” या ऑनलाईन प्रणालीव्दारे प्राप्त अर्जदारांना परवाने निर्गमित करण्यात येत होते . मात्र महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यामध्ये सदर गुजरात राज्याच्या वाहतूक परवान्याचा व e -Tp चा गैरवापर होत असल्याचे निर्दशनास आलेले आहे . त्यामुळे वाळू रेती लिज धारक व वाळू / रेती साठा व विक्री परवानाधारक यांना सद्या स्थितीला – TP परवाने निर्गमित करण्यात येत आहेत . तसेच अवैध गौण खनिज वाहतूकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी जीपीएस . बसविणे व महाखनिज प्रणाली सोबत संलग्न करणे अनिवार्य केलेले आहे . परराज्यातील वाळू रेती वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर वाहन मालकांनी दि . १६ मार्च २०२२ पूर्वी वर नमुद केल्याप्रमाणे GPS Device बसविने अनिवार्य आहे . याशिवाय Geo Fencing कार्यवाही करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:12 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!