वडाळी (प्रतिनिधी p c पटेल) – म्हसावद ता. शहादा येथे भीम जयंती उत्सव साजरा करण्यासाठी बैठक घेण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी गौतम अहिरे होते. समस्त समाज बांधव यांच्याशी विचारविनिमय करुन सर्वानुमते पुढील कामाची रूपरेषा ठरविण्यात आली व समिती गठीत करण्यात आली.यावेळी भीम जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष म्हणून विक्रांत अहिरे यांची तर उपाध्यक्ष म्हणुन संघर्ष अहिरे यांची निवड करण्यात आली. कार्यकारीणीत खजिनदार राहुल बागले,सचिव शुभम आगळे.सदस्य पदी सिध्दार्थ पिपंळे,अनिल अहिरे,अमोल अहिरे,तुषार बैसाणे,ऋषिंकेश वाघ, बुध्दभुषण जाधव,निलेश गवळे, सतिश आखाडे,कृष्णा आगळे,अभिषेक जाधव,आकाश आखाडे,कार्तिक पिंपळे यांचा समावेश करण्यात आला. यावेळी चुनिलाल अहिरे,रविकांत महिन्द्रे, मुकुंद अहिरे,पत्रकार पुलायन जाधव,छोटूलाल बैसाणे,महेंद्र बैसाणे,मोहन अहिरे,मधुकर अहिरे,नरेश गवळे,तुषार बैसाणे, शांतीलाल गवळे,रमाकांत अहिरे, गौतम आगळे,रवींद्र अहिरे आदि समाज बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन महेंद्र आगळे यांनी केले.