प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती विरोधात नंदुरबार येथे थाळी वाजवून व एकमेकांना मिठाई वाटून युवती सेने तर्फे आंदोलन करण्यात आले .
यावेळी निवेदनात म्हटले आहे की , पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे . संपूर्ण भारतात आज पेट्रोल शंभरीच्या पार गेले आहे .
महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव १२० रुपये तर डिझेल ९ ८ रुपयांच्या जवळ पास आहे . केंद्र सरकारने अच्छे दिन आणण्याची स्वप्न दाखवून गोरगरीब जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे . केंद्र सरकारच्या विरोधात आज नंदुरबार जिल्हा युवती सेनेच्या वतीने पेट्रोल पंपा बाहेर आंदोलन करण्यात आले . तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . केंद्रसरकारने गोरगरिबांना अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवले होते परंतु ते अच्छे दिवस अजून अजून आलेच नाहीत . मोदी सरकारने महागाई चा आगडोब पसरवला आहे त्यात सर्व सामान्य जनता होर पळून गेली आहे .म्हणून नंदुरबार युवती सेनेच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात आज थाळी वाजवून व एकमेकांना मिठाई वाटून आंदोलन करण्यात आले . यावेळी युवती सेनेच्या जिल्हाध्यक्ष मालतीताई वळवी , भारती ठाकरे , रीना वसावे , रीना पाडवी , रमिला वसावे , मनुबाई सोनवणे , वैशाली सोनवणे , दिव्या सोनवणे , पूनम वळवी , प्रियंका वळवी , व युवती सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.