प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – नंदुरबार येथे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात युवासेने तर्फे गाजर दिखावो आंदोलन करण्यात आले .
यावेळी निवेदनात म्हटले आहे की , पेट्रोल , डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव १२० रुपये तर डिझेल ९ ८ रुपयांच्या जवळपास आहे . केंद्र सरकारने अच्छे दिन आणण्याची स्वप्न दाखवून गोर गरीब जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे .
याच्या विरोधात आज नंदुरबार जिल्हा युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे यांच्या नेतृत्वाखाली दीनदयाल चौकात गाजर दिखावो आंदोलन आंदोलन करण्यात आले .
तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली . तसेच महागाईच्या विरोधात गाजर दाखवून निषेध करण्यात आला .
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे , उपजिल्हाप्रमुख रविंद्र गिरासे , शहर प्रमुख राजधार माळी , नगरसेवक गजेंद्र शिंपी , युवासेना जिल्हा सचिव दिनेश भोपे , शहर अधिकारी दादा कोळी , शिवसेना शाखा प्रमुख दिग्विजय पाटील , लखन माळी , आनंद पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .