नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पातोंडा शिवारात कुटूंबिय घरात झोपलेले असतांना धाडसी चोरी

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार – नंदुरबार तालुक्यातील पातोंडा शिवारातील मातोश्री कॉलनीतील मध्यरात्री चोरटयांनी कुटूंबिय घरात झोपलेले असतांनाही चलाखीने धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली .
या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्या चांदीचे दागिने असा ६४ हजाराचा ऐवज चोरून नेला . याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ; नंदुरबार तालुक्यातील पातोंडा शिवारात असलेल्या मातोश्री कॉलनीत राहणारे गणेश छगन पवार यांच्या घरी चोरटयांनी डल्ला टाकला . पवार कुटूंबिय नेहमी प्रमाणे जेवण करून घरात झोपलेले होते . असे असतांना मध्यरात्री चोरटयांनी घराचा मागील दरवाजा उघडून आत प्रवेश केला . यावेळी कपाटातून तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले १० भार वजनाचे चांदीच्या पायातील जोडवे आणि स्टीलच्या डब्यात ठेवलेली ४०हजार रूपयांची रोकड असा एकूण ६४ हजार रूपयांचा ऐवज चोरटयांनी लांबविला आहे . दुसऱ्या दिवशी गणेश पवार यांचे कुटूंबिय उठल्यावर घरात साहित्य अस्ताव्यस्त तर घराचा मागील दरवाजा देखील उघडा असल्याचे दिसून आले .
या बाबत गणेश छगन पवार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
त्यानुसार अनोळखीं विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:00 pm, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!