नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दुचाकी अपघातात विद्यार्थिनीसह तरुण ठार


जळगाव (भुवनेश दुसाने) : जिल्ह्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येतेय. अशातच काल बारावीचा पेपर देण्यासाठी येथे दुचाकीने निघालेल्या विद्यार्थिनीसह तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पायल कैलास पवार (वय १९, रा.शिवाजीनगर, जळगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तेजस सुरेश महेर (वय २०) मृत तरुणाचे नाव आहे.
विशेष म्हणजे, ही विद्यार्थिनी जळगावहून पाचोऱ्याला रेल्वेने निघाली होती. मात्र, ती रेल्वे पाचोऱ्याला न थांबल्याने तिला चाळीसगावला उतरावे लागले. तेथून परीक्षेसाठी दुचाकीने येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
पायल पवार हिने जळगावातील आयुष करिअर अकॅडमीत पोलिस भरती प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. तर बारावीच्या परीक्षेसाठी तिने गाळण (ता.पाचोरा) हे केंद्र निवडले होते. गुरुवारी सकाळी पायल मराठीचा पेपर देण्यासाठी जळगावहून पाचोऱ्याला रेल्वेने येण्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर आली. मात्र, नजरचुकीने ती पाचोऱ्याला न थांबणाऱ्या गाडीत बसली. गाडीने जळगावातून थेट चाळीसगावला थांबा घेतला. त्यामुळे चाळीसगावला उतरल्यावर पायलने भांबावलेल्या स्थितीत आयुष अकॅडमीच्या शिक्षकांना फोनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
त्यामुळे अकॅडमीच्या शिक्षकांनी तत्काळ कन्नड तालुक्यातील पांगरे येथील तेजस सुरेश महेर (वय २०) या विद्यार्थ्याशी संपर्क साधला. तोदेखील अकॅडमीचा विद्यार्थी होता. मात्र, सध्या गावी गेलेला होता. त्याला चाळीसगाव येथून पायलला सोबत घेऊन गाळणला सोडून देण्याची विनंती शिक्षकांनी केली. त्यानुसार तेजस दुचाकीवर (क्र.एम.एच.१४-जी.क्यू.४१४४) पायलला घेऊन चाळीसगाव येथून गाळण येथील परीक्षा केंद्रावर जात होता. वाटेत भडाळी-भामरे रस्त्यावर पिकअप व्हॅनने (क्र.एम.एच.१९-सी.वाय.३४३१) दुचाकीला धडक दिली. या अपघातात तेजस महेर याचा जागीच मृत्यू झाला. तर पायल पवार ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. ग्रामस्थांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने काही वेळाने तिची प्राणज्योत मावळली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:27 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!