सुतारवाडी : – (हरिश्चंद्र महाडिक) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक बंगल्यावरसंतप्त एस.टी. कर्मचाऱ्यांचा जमावानेअचानकपणे हल्ला केला. या हल्ल्याचा संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र निषेध करण्यात आला. या हल्ल्याची गंभीर दखल रोहा तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली. रोहा येथील नगरपरिषद इमारतीच्या बाजूच्या चौकात हल्ल्याचा तीव्र निषेद करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, शहर महिला आघाडी अध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, युवती अध्यक्ष रवीना मालुसरे, शिवराम शिंदे, अनंतराव देशमुख, महेश कोलाटकर, राजेंद्र जैन, रामचंद्र सकपाळ, सतीश भगत, राम नाकती, घनश्याम कराळे, सुभाष राजे, मजीत पठाण, नितीन पिंपळे, अनिल भगत, संदिप चोरगे, तसेच अन्यजणांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. मा. शरद पवार साहेबांनी केवळ आपल्या पक्षासाठीच नाही तर अन्य पक्षांतील विविध अडचणी असलेल्यांना न्याय मिळवून दिला आणि देत आहेत. अशा महान व्यक्तीच्या बंगल्यावर भ्याड हल्ला होणे हे कितपत योग्य आहे. हल्लेखोरांवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.