धुळे प्रतिनिधी: दोंडाईचा शहरातील केशरानंद पेट्रोल पंप परिसरात दरोडा टाकण्याच्या इराद्याने लपून बसलेल्या टोळक्याने पोलिसांना पाहून ओळख काढल्याने पोलिसांनी त्या टोळक्याचा पाठलाग करत त्यांचा म्होरक्याला जेरबंद केले.
दोंडाईचा पोलीस दिनांक दहा रोजी रात्री 9:30 च्या दरम्यान केशरानंद पेट्रोल पंप कडून नंदुरबार चौफुली कडे गस्त घालत असताना त्यांना पाहून एका टोळक्याने धूम ठोकली. त्यामुळे पोलिसांना त्या टोळक्यावर वर संशय आला पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत टोळक्याच्या म्होरक्याला ताब्यात घेतले.
त्यावेळी पोलिसांना त्या संशयीता जवळ दरोडयाचे साहित्य आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या किरण्या भील रा. डालडा घरकुल, दोंडाईच्या याने पळून गेलेल्या आपल्या टोळक्यातील साथीदारांची नावे पोलिसांना सांगितले. त्यात साजन हिरु भील राहणार टेक भिलाटी, दोंडाईचा विजय सावन नेसले रा. संतकबीर नगर, दोंडाईचा मनोज उर्फ जग्या भगवान भिल रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा मन्या उर्फ मनीष गणेश भिल राहणार डाबरी घरकुल, दोंडाईचा निलेश खंडू संसारे रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा व मन्या कायसिंग भील रा. टेकभिलाटी, दोंडाईचा यांचा समावेश होता.
पोलिसांनी या ठिकाणाहून एम एच 39 बी 92 22 या मोटरसायकल सह गुप्ती, लोखंडी रॉड, लोखंडी सळई असा एकूण 1 लाख 520 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला शिवाय पो. कॉ. शुभम चित्ते यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला पोसई. तपास करीत आहेत.