प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील ढेकवद गावाजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली . या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , तालुक्यातील नवापूर घोगळपाडा येथील दिलीप सखाराम वळवी हे दुचाकीने
( क्र . एम.एच .४१ क्यू ६६५ ९ ) नंदुरबार ते नवापूर रस्त्याने जात होते . यावेळी मिलींद रविंद्र चौधरी,
( रा . नंदुरबार ) याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून ढेकवद गावा जवळ दुचाकीला समोरुन धडक दिल्याने अपघात घडला . घडलेल्या अपघातात दिलीप वळवी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला . तसेच दोन्ही वाहनांचे ही नुकसान झाले .
या बाबत सुनिल सखाराम वळवी यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात मिलींद जाधव याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४( अ ) , २७ ९ , ३३७ , ३३८ , ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोहेकॉ.सुरेश वसावे करीत आहेत .