सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक ) प्रियेशी साठी ताजमहाल बांधणारे तुम्ही कितीतरी बघितले असतील पण रयेतेसाठी व आईसाठी स्वराज्य निर्माण करणारे एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता. म्हणूनच जेथे स्त्रीचा सन्मान होतो. तेथेच स्वराज घडत असतो.ज्यांच्या मुळे धर्म आहे.ज्यांच्यामुळे मी किर्तन करू शकते असे मत ह.भ.प. शितलताई साबळे महाराज (नगर ) यांनी महादेववाडी येथील अखंड हरीनाम सप्ताहात आयोजित किर्तन सेवेत देव जाणता देव जाणता l आपुलिया सत्ता एकाएकी ll १ll देव चतुर देव चतुर l जाणोनी अंतर वर्ततसे ll धु ll देव निराळा देव निराळा l अलिप्त विटाळ तुका म्हणे ll २ll या जगद गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे स्पष्ट केले. जगात चार प्रकारची माणसे चतुर असतात एक नंबर देव, दोन छत्रपती शिवाजी महाराज, तीन नंबर बिरबल, चार नंबर माणूस, आरोपीला जेव्हा फाशीची शिक्षा होते. तेव्हा त्याला आदल्या दिवशी न्यायाधीश व वकील त्या आरोपीला कोणतेही शेवटची इच्छा विचारतात व ती पुर्ण करतात तेव्हा आरोपी न्यायाधिशाला बोलतो.कि माझ्या जागेवर तुम्ही फाशी घ्या.तसेच चतुर बिरबल बादशहाचे प्रश्न झटक्यात सोडवतो, तसेच शिवाजी महाराज हे चतुर आहेत. तर यांच्या सर्वांच्या पेक्षा चतुर भगवान परमात्मा आहेअसे मत ह.भ.प. शितलताई साबळे यांनी वरील अभांगाच्या आधारे पटवून दिले. यावेळी गायनाचार्य ह.भ.प. रविंद्र मरवडे, गणेश दिघे,नरेश दळवी, मृदूंगमनी प्रसाद भऊर, ज्ञानेश्वर दळवी,विजयानंद महाराज तेलंगे,अनिल महाराज सानप,सुनिल भऊर,अक्षय ओव्हाळ,रविंद्र सागवेकर सरपंच, रंजना दळवी,चंद्रकांत बाईत,नथुराम बाईत, चंद्रकांत भऊर, धोंडू चितळकर, शांताराम बाईत, पांडुरंग बाईत,कोलाड-खांब परिसरातील तसेच रोहा तालुक्यातील असंख्य वारकरी, ग्रामस्थ मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, नवतरुण युवक मंडळ, व समस्त महिला मंडळ महादेववाडी उपस्थित होते.