प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – : नंदुरबार येथून पत्रकाराची दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्यास मध्य प्रदेश राज्यात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली .
या बाबत अधिक माहिती अशी की , दि . 9 ते 10 एप्रिल दरम्यान नितीन अरुण पाटील व्यवसाय पत्रकार रा . वृंदावन कॉलनी नंदुरबार यांच्या मालकीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटर ” सायकल ( क्र.एम.एच .39 , आर . 6564 ) ही त्यांच्या राहत्या घराच्या अंगणातून कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता . स्थानिक गुन्हे शाखे मार्फत सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असतांना दि ६ मे २०२२रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मोटर सायकल मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील सनावद येथील सुलतान शेख व त्याचा साथीदार सुरत ठाकुर अशांनी मिळून चोरी केलेली आहे . त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ तयार करुन त्यांना सनावद जि . खरगोन येथे रवाना केले स्थानिक गुन्हे शाखेच्या . पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने सुलतान शेख व त्याचा साथीदार सुरज ठाकुर यांचा शोध घेतला असता दि .७ मे रोजी सनावद गावातील मुख्य बाजार पेठेतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुलतान रशिदशाह दिवान रा . इनपुन गोगावा रोड , सनावद ता सनावद जि . खरगोन मध्य प्रदेश यास अटक करून त्यास गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने सदरची मोटर सायकल ही खरगोन जिल्ह्यातील मेनगांव येथे नादुरुस्त झाल्याने मोटर सायकल तिथेच सोडून दिल्याचे सांगितल्याने मेनगांव जि . खरगोन पोलीसांची संपर्क करुन त्यांना सदर बाबत माहिती देवून मोटर सायकल ताब्यात घेण्यास सांगितले आहे . ताब्यात घेण्यात आलेला सुलतान दिवान यास त्याचा साथीदार सुरज ठाकुर याचा सनावद परीसरात शोध घेतला असता तो मिळुन आला नाही . म्हणून सुलतान रशिदशाह दिवान यास गुन्ह्याचा पुढील तपास कामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच नंदुरबार जिल्ह्यातील इतर मोटर सायकल चोरीचे गुन्हे देखील उघडकिस येण्याची शक्यता आहे .
सदर ची कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक गौरव सिंह , अपर पोलीस अधीक्षक , विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार महेंद्र नगराळे , प्रमोद सोनवणे , गोपाल चौधरी , राकेश मोरे शोएब शेख , रामेश्वर चव्हाण अभय . राजपुत , आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे .