प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – धडगांव वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनविभागाने धडक कारवाई करत अवैध पणे तोडून ठेवलेल्या सागवनच्या 24 दांड्या जप्त केल्या .
सदर सागवनी दांड्या कात्री येथील ( नलदापाडा ) कक्ष क्रमांक 189 च्या लगत अवैध पणे तोडून रस्त्याच्या कडेला वाहतुकीच्या उद्देशाने आणून ठेवलेल्या मिळून आल्या . सदर ठिकाणी शोध घेतले असता कोणताही इसम मिळून आले नसल्याची माहिती वनविभागाने दिली . सदर दांड्या 0.61 घनमीटर असुन 12 हजार 88 रूपये किमतीचे आहेत . शासकीय वाहनाने धडगाव टिंबर डेपोत जमा केले आहेत .
या बाबत वनपाल माकडकुंड यांनी प्र.रि.क्र . 02 / 202223 चा गुन्हा नोंदविला .
सदर कार्यवाही म.उपवनसंरक्षक नंदुरबार के.बी.भवर , सहाय्यक वनसंरक्षक ( रो.ह.यो. ) अक्राणी एस.डी.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली , वनक्षेत्रपाल अक्राणी ( प्रा . ) ए.एस. पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल माकडकुंड बी.एम. परदेशी , वनरक्षक अकवाणी आर.झेड.पावरा , वनरक्षक पिंपरी जी . बी . तडवी , वनरक्षक धडगाव ए . एस . पाडवी , वनमजूर मगन पटले , बिजला वळवी यांनी केली .