प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – तामिळनाडू राज्यातील विशाखापट्टनम येथील एकाला देवाची लाकडी मुर्तीची आमिष दाखवून विश्वास संपादन करून १ लाख ७२ हजाराची फसवणूक करून दुखापत करीत जबरी चोरी केल्या प्रकरणी अज्ञात चार जणांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , जिंगाली रविंद्र यादव रा.नंदामुरारीनगर विशाखापट्टनम ( तामिळनाडू ) हा जानेवारी २०२२ च्या सुरूवाती पासून अकोला स्टेशन पास केल्या नंतर त्याचा मोबाईल क्रमांकावर करण पवार या इसमाने ५० हजार रूपयाची विष्णु भगवानाची एक लाकडी मुर्ती ही २५ हजारात देतो असे आमिष दाखवुन जिंगाली यादव यांच्या विश्वास संपादन करून फोनपेद्वारे वेळो वेळी २० हजार रूपया पेक्षा जास्त रक्कम पाठविली .
तसेच नंदुरबार शहरातील गौरव प्लाजा येथे दोन वेळा एक हजार रूपया प्रमाणे पैसे घेवून त्यानंतर पुन्हा करण् पवार इसमाचा मित्र मनोज पवार याने तीच मुर्ती पाहिजे असल्यास दिड लाख रूपये लागतील असे सांगितले . त्यानंतर जिंगाली यादव याने नंदुरबार शहरातील परिसरात बसस्थानक असलेल्या एचडीएफसीच्या एटीएम मधून पैसे काढून दिड लाख रूपये जमविले त्यानंतर दि .६ मे रोजी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास मनोज पवार तेथे आला व त्याने जिंगाली यादव याला मोटरसायकल वर बसून नेहरू चौक गांधी पुतळा येथून उड्डाणपुल वरून जात प्रकाशा येथील तापी नदी वरील बीजकडे घेवून गेला . त्यानंतर खाली उतरून बरेच पुढे नेल्यानंतर मनोज पवार याचे दोन अनोळखी साथीदार त्याठिकाणी आले . त्यातील एकाने जिंगाली यादव याला सुरा दाखवून आम्हाला पैसे देवून टाका अशी धमकी देवून पोटात बुक्का मारला तर दुसऱ्याने जोरात लाथ मारत जिंगाली यादव याच्या कडील दिड लाख रूपये रोख व १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लंपास केला .
या प्रकरणी जिंगाली रविंद्र यादव याच्या फिर्यादी वरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मोबाईल धारक करण पवार , मनोज पवार तसेच अज्ञात दोन अनोळखी इसमाविरूध्द भादंवि कलम ४२० , ३ ९ ४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत .