प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – तालुक्यातील ढेकवद गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने पती – पत्नी जखमी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर तालुक्यातील मोरकारंजा येथील विनायक धर्मा गावित व त्यांची पत्नी रेशमीबाई विनायक गावित हे दोघे दुचाकीने नंदुरबारहून मोरकारंजा गावाकडे जात होते . यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार ( क्र . जी . जे .०५ जेजे ६०३८ ) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन ढेकवद गावा जवळील पेट्रोल पंपा जवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला . घडलेल्या अपघातात विनायक गावित व रेशमीबाई गावित यांना दुखापत झाली .
याबाबत विनायक गावित यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात वाहन चालका विरोधात भादंवि कलम २७ ९ , ३३७ , ३३८ , ४२७ , मोटार वाहन कायदा कलम १८४ ,१३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोना . विनायक सोनवणे करीत आहेत .