प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – नंदुरबार तालुक्यातील शिवन नदी फाट्या जवळील ढाब्यावर जेवण करणाऱ्या दोघा मित्रांना मारहाण करुन त्यांच्या खिश्यातुन रोकडसह मोबाईल लांबविण्यात आल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी चौघांविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार तालुक्यातील वाघोदा येथील रहिवाशी कैलास रमेश पाडवी हा त्याच्या दोघे मित्रांसह वाळुच्या झिरो रॉयल्टीच्या हिशोब करून शिवण नदीफाट्या जवळील ढाब्यावर जेवण करीत असतांना ५ ते ६ जणांनी दुचाकीवर येवून शिवीगाळ करीत हातातील लाकडी डेंगाऱ्याने , लोखंडी रॉडने मारहाण केली . तसेच १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल , झिरो रॉयल्टी हिशोबाचे २८,५०० रुपये रोख , तसेच पिना नाईक याच्या खिश्यातुन १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरजस्तीने हिसकुन नेला . कैलास रमेश पाडवी याच्या फिर्यादी वरुन अंबालाल ठाकरे , सचिन ठाकरे रा . नंदुरबार , सागर जावरे रा . खोंडामळी , गणेश विजय वाघ रा . वाघोदा व इतर ५ ते ७ साथीदारांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३ ९ ५ , ३ ९ ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,
पुढील तपास पोलीस निरिक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत .