*शहादा तालुका प्रतिनिधी राहुल आगळे*
शहादा शहरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन मध्ये एक व्यक्ती पैसे काढत असतांना त्रुटी येत होत्या यावेळी अज्ञात व्यक्तीने मदत करतो म्हणून त्यांच्याकडून पासवर्ड विचारून पैसे काढून देतो असे सांगितले.
मात्र त्या अज्ञाताने एटीएम कार्ड अदला-बदल करत पोबारा केला असून दुसऱ्या एटीएम मशीन मधुन अज्ञाताने त्यांच्या खात्यातून ८०हजाराची रोकड काढून नेली आहे.याप्रकरणी शहादा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , शहादा शहरातील दीपक निकुंबे हे पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये गेले होते. त्या दरम्यान पैसे निघत नसल्याने अडचणी येत होत्या. यावेळी मागून आलेल्या अज्ञाताने त्यांच्या पासवर्ड माहिती करून घेत त्यांच्याकडील एटीएम कार्ड ची फेरफार करून त्यांची दिशाभूल केली आहे. अज्ञात व्यक्तीने ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहरासह तालुक्यातील नागरिकांनाही व्यक्ती आढळल्यास मोबाईल नंबर ९४२३९०५१५५ सह शहादा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आव्हान पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी केले आहे.