धुळे :- तालुक्यातील बाभुळवाडी येथे तरूण शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलिसात नोंद झाली आहे.
राकेश अर्जुन पाटील (वय 32 रा. बाभुळवाडी) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. त्याने काल दि. 1 रोजी राहत्या घरात छताच्या लाकडी सर्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.
त्याला नागरिकांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. पुढील तपास पोहेकाँ सोनवणे करीत आहेत.