प्रतिनिधी : अनिल बोराडे
पिंपळनेर – येथील कै. एन एस पी पटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. साहेबराव पंडित पाटील यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्ताने विविध शालेय स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. साहेबराव पंडित पाटील यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष सुभाष दामोदर जगताप, सुधाकर पंडितराव गांगुर्डे, सचिव महेंद्र रामराव गांगुर्डे, स्कुल कमिटी चेअरमन संजय माधव नेरकर, संचालक उत्तम सहादू माळी, पराग वसंत गांगुर्डे, राजेंद्र लक्ष्मण देशमुख, शैलेंद्र रामराव पाटील व पत्रकार राजेंद्र गवळी, सुभाष जगताप, अनिल बोराडे, मुख्याध्यापक सागर शाह, उपमुख्याध्यापक उमेश पाटील, एच पी शेटे, आर.डी. सोनजे, एल.बी.मुसळे आदींनी पुष्पहार फुल अर्पण करीत संस्थेचे संचालक मंडळ शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यांनी अभिवादन करीत पुण्यतिथी साजरा केली. यावेळी कै. साहेबराव पंडित पाटील यांच्या जीवनाविषयी शिक्षक तुषार पवार व ललित मुसळे यांनी महिती दिली.
पुण्यतिथी निमित्ताने गेल्या सत्ता भरात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्र. रोहित दीपक सावंदे व ओम घरटे, द्वितीय हिमाने किरण जगताप व दुर्गा कापसे, तृतीय अपेक्षा मनोज खैरनार व वेदिका महाले. लहान गटात प्रथम रोशनी पंडित अहिरे, द्वितीय मंदार प्रवीण मोरे, तृतीय राधा आणि ग्रुप. वादविवाद स्पर्धा प्रथम एखंडे कणन रोहिदास, द्वितीय सिद्धी संजय कोठावदे, तृतीय नयन तुषार देशमुख, चित्रकला स्पर्धेत प्रथम पूर्वा सागर शहा, द्वितीय तनुश्री रवींद्र रामोळे, तृतीय स्वरा दीपक महाजन, हस्तकला प्रथम गौरव वसंत वाडीले, द्वितीय आयुष मधुकर बदाने, तृतीय मुक्ता विनोद पाटील, तर या पुण्यतिथी निमित्ताने आकर्षण ठरले वादविवाद स्पर्धा प्रथम इशा फकीरा बिरारीस, द्वितीय माणसे आनंद भामरे, तृतीय हिमानी किरण जगताप. निबंध स्पर्धेत प्रथम दिशा त्रंबक पगारे व देवयानी ढोले, द्वितीय ऐश्वर्या कोतकर व पुनम शिंदे, तृतीय वैष्णवी अनिल कोठावदे व तनवी गायकवाड बक्षीसाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री अकलाडे यांनी तर आभार अविनाश देवरे यांनी मानले.