प्रतिनिधी: ( हरिश्चंद्र महाडिक)
=========================
सुतारवाड़ी :-. गेल्या महिन्यापासून विळे परिसरात एका माकडाने संचार केला असून तो कधी विळा नाक्यावर तर कधी बाजारपेठेत मुक्तपणे संचार करत असतो. दुपारच्या दरम्यान हा माकड विळे नाक्यावर पुणे – माणगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा असतो. कधी कधी हा माकड येथून जाणाऱ्या चार चाकी बरोबर धावत जातो आणि काचेवर हाताची थाप मारतो. यामुळे येथून चारचाकी मधून प्रवास करणाऱ्या कुटुंबाला इजा करतो की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.
विळे – भागाड मध्ये अनेक कंपन्या असल्यामुळे या परिसरात वास्तव्य करणाऱ्यांची लोकसंख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे माणगाव येथील हायस्कूल आणि कॉलेज मध्ये जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याने दुखापत केली तर मोठा अनर्थ होईल. गेल्या महिन्यापासून मुक्तपणे संचार करणाऱ्या माकडाला वनविभागाने पकडून जंगलामध्ये सोडणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही जंगल खात्यातील अधिकारी वर्गाने दखल घेतलेली नाही.
एखादा साप घरात शिरला तर सर्पमित्र त्याला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडून देतात त्याला जीवदान देतात हे योग्यच आहे. मात्र जंगलातून मानववस्तीत आलेल्या नागरिकांना त्रास देणाऱ्या या माकडाला पकडून त्याला जंगलात सुरक्षित सोडून द्यायला वनखाते का पुढे येत नाहीत असा नागरिकांना प्रश्न पडला आहे .
========================