प्रतिनिधी – (दिप्ती पाटील)
उरण :– रायगड जिल्ह्यात फिलिपाईन्स येथील बोट अलिबाग तालुक्यातील नवगावच्या खडकात अडकली होती.ह्या बोटीचे नाव पौर्णिमा असुन ही पुर्णिमा बोट रेवस वरुण काल दुबई ला निघालेली होती. खराब हवामाना मुळे ती बोट अडकली होती. गेले तीन चार दिवस रायगड ला हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केले होते.सोसाट्याच्या वार्रा पावसामुळे नवगांवच्या खड़पावर हि बोट लागली होती. या बोटी मध्ये एकुन पाच कर्मचारी होते. भारतीय तटरक्षक दलाचे जवान व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्या बोटीतील पाचही कर्मचार्याना वाचविण्यात तटरक्षक दलातील जवानांना यश आले असून सर्व कर्मचारी सुखरूप मुंबईला नेले आहेत.