DPT News धुळे: नुकत्याच झालेल्या औरंगाबाद येथे ए आय एस एफ (AISF) वैद्यकीय समितीने 2022 चा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले होते त्यात महाराष्ट्रातील तीन मुख्याध्यापकांना हे आदर्श पुरस्कार देण्यात आले त्यात धुळ्यातील आर एम पटेल उर्दू हायस्कूल व ज्यू. कॉलेज, साबीर नगर ,धुळे चे मुख्याध्यापक पठाण इम्रान खान नजीम खान यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आला
. मुख्याध्यापक इम्रान खान यांनी केलेल्या भरीव शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत AISF वैद्यकीय समितीने राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक महाराष्ट्र राज्य 2022 हा पुरस्कार,औरंगाबाद येथे देण्यात आला आहे. म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला ह्या वेळी मुख्तार शेख , अझहर पठाण मित्रपरिवार तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्तार मुख्तार शेख , अझहर पठाण, एजाज शेख, कासिद खान, इम्रान शेख, सुफियान शेख , नाजीम पठाण , मोईन शेख आदी उपस्थित होते.