प्रतिनिधी – प्रविण चव्हाण
नंदुरबार -: महाराष्ट्र गुजरात सीमेवरील धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चरणमाळ घाटात अति तीव्र उतार वळणामध्ये रात्री साडेदहा ते अकरा दरम्यान सटाणा हून गुजरात नडियाद येथे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसचा अपघात झाला आहे .
या अपघातात चालक व एका अठरा महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला असून ३० प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे . 108 व खाजगी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना नवापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . अपघात झालेल्या खाजगी लक्झरी बस मध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे .
चरणमाळ घाट अती तीव्र उतार व वळणाचा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेहमी अपघात होतात . काल रात्री झालेला अपघात खाजगी लक्झरी प्रवासी वाहनाचे व प्रवाशांचे मोठे नुकसान झाले आहे .