नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तब्बल ४२ दिवस मृतदेह मिठात राखून ठेवला

पुन्हा शवविच्छेदन करुन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा



नंदुरबार – रविंद्र गवळे
धडगांव तालुक्यातील खडक्या येथे मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करत मयत मुलीच्या पालकांनी तब्बल ४२ दिवसांपासून मृतदेह मिठामध्ये राखून ठेवला आहे. याबाबत मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे तसेच जोपर्यंत संबंधीत दोषींवर कारवाई होवून मयत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा पवित्रा घेण्यात आल्या आहे. दरम्यान, पोलीसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, धडगांव तालुक्यातील खडक्या येथील एका विवाहित मुलीला तालुक्यातील वावी येथील रहिवाशी व अन्य एकजण १ ऑगस्ट २०२२ ला बळजबरी गाडीवर बसवून घेवून गेला होता.त्यानंतर सदर पिडीत विवाहितेने तिच्या नातलगांना सांगितले की, वावी येथे रणजीतसह चार जण चित्रपटाप्रमाणे कुकर्म करीत असून मला हे मारणार आहेत, असे वाटते. त्या ठिकाणचे फोटोही सदर विवाहितेने नातेवाईकांना पाठविले होते.त्यानंतर तिचे कुटूंबिय वावी येथे गेले असता सदर विवाहित मुलगी ही आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह आंब्याच्या झाडावरून खाली उतरविला, असे तिच्या पालकांकडून सांगण्यात येत आहे.पिडीतेवर बलात्कार झाल्याचे कुटूंबियांनी सांगूनदेखील तिच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झालेली आढळून आली नाही. आंब्याचे झाड उंच असून त्याठिकाणी ती विवाहिता कशी चढू शकते, असा प्रश्‍न कुटूंबियांनी उपस्थित केला.याबाबत पोलीसांनी सुरुवातीला आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. तसेच वावी येथील रणजीत ठाकरेसह तिघांना अटक केली आहे. त्या मुलीचा मृतदेह कुटूंबियांकडे अंतिमसंस्कारासाठी सोपविण्यात आला होता.मात्र मुलीच्या पित्याने जोपर्यंत पिडीतेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार करत घराशेजारच्या शेतात खड्डा करून त्या मयत विवाहितेचा मृतदेह मिठामध्ये पुरण्यात आला.त्यानंतर कुटूंबियांसह ग्रामस्थांनी धडगांव पोलीस स्टेशनसह थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून आपले गार्‍हाणे मांडले. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर पिडीत युवतीचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचा सूचना धडगांव पोलीसांना दिल्या.

*प्रतिक्रिया :-*
सदर घटनेत पिडीतेच्या मृत्यूपुर्वी व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपची तपासणी करण्यात येत आहे. यात काही तथ्य आढळल्यास वाढीव कलम लावण्यात येतील. याबाबत धडगांव येथील तहसिलदारांशी याबाबत पत्र व्यवहार करण्यात आलेले आहे.तसेच घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल व संशय दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

श्रीकांत घुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा

प्रतिक्रिया :-
माझ्या मुलीने गळफास घेवून आत्महत्या केलेली नसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला असून त्यानंतर झाडावर लटकविण्यात आले आहे. तिला न्याय मिळविण्यासाठी तिचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे, जोपर्यंत पुन्हा शवविच्छेदन होत नाही. तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही.

*पिडीतेचे वडील*

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:22 pm, January 15, 2025
temperature icon 25°C
घनघोर बादल
Humidity 46 %
Wind 14 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!