नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कस्टम अधिकारी असल्याचे भासवून हिरे व्यापाऱ्याकडे 80 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना मुंबई क्राइम ब्रँचने बेड्या ठोकल्या..

मुंबई प्रतिनिधी सुनील कांबळे

मुंबई : कस्टम अधिकारी असल्याचे भासवून हिरे व्यापाऱ्याकडे 80 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना मुंबई क्राइम ब्रँच युनिट 12 ने बेड्या ठोकल्या आहेत. दोन बोगस कस्टम अधिकाऱ्यां सह हिरे व्यापाऱ्याकडे काम करणारा एक कामगार अशा एकूण तीन आरोपींना पोलीस पथकाने अटक केली आहे. विजय हिम्मतभाई हिरपारा, रवी अरविनभाई घोघरी आणि किसन पुरुषोत्तमभाई शिरोया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही आरोपी गुजरातमधील सुरतचे रहिवासी आहेत.

हिरे व्यापाऱ्याने नोकराच्या हातून दुबईला हिरे पाठवले
गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने त्याच्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या हातून 3 कोटी 5 लाख 19 हजार रुपयांचे हिरे दुबईला पाठवले होते.

आपल्याला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचे नोकराने मालकाला सांगितले
पण हिरे व्यापाऱ्याच्या माणसाने दुबईला न जाता त्याच्या मालकाला फोन करून कळवले की, त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे आणि त्याला सोडण्यासाठी 80 लाखांची मागणी करत आहे.

बोगस कस्टम अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन दहिसरमध्ये बोलावले मालकाला
एवढेच नव्हे तर अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींनी स्वत:ला कस्टम विभागाचे अधिकारी सांगत हिरे व्यापाऱ्याशी फोनवर बोलून पैसे देण्यासाठी दहिसर येथील हॉटेलमध्ये बोलावले.

क्राईम ब्रांचने आरोपींना रंगेहाथ पकडले
त्यानंतर क्राइम ब्रँच युनिट 12 च्या टीमला हिरे व्यापाऱ्याने या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकून तीन आरोपींना रंगेहाथ अटक केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:28 am, January 15, 2025
temperature icon 23°C
टूटे हुए बादल
Humidity 49 %
Wind 17 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!