प्रतिनिधी – दिप्ती पाटील (उरण)
रायगड :– एम. जी. एम. हाॅस्पिटल कामोठे फिजिओथेरपी डिपार्टमेंट, आॕथोटीक्स डिपार्टमेंट, प्रोस्थटीक्स डिपार्टमेंट आणि उरण तालुका दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज बोकडविरा येथील गणेश मंदिरामध्ये दिव्यांग बांधवांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज दि. ४आॕक्टोबर रोजी १ ते ५ यावेळेत शिबीर संपन्न झाला.
या शिबिराचे मुख्य हेतू असा होता कि जे दिव्यांग बांधव एका पायाने थोडे वाकडे चालतात. ज्यांना पोलिओ झालेला आहे. व ८० टक्के पायाची किंवा हाताची हालचाल होत आहे. अशा दिव्यांग बांधवांनची डॉ यांनी त्याची तपासणी केली. त्यांचे. वजन मोजले. आणि कॅलीपर साठी किती योग्य आहेत व त्यासाठी त्याची व्यायाम करुन मग कशे फिट होतील ते तपासुन आलेल्या १० दिव्यांग बांधवांना थोड्याच दिवसात अगदी मोफत कॅलीपर देण्याची व्यवस्था एम. जी. एम हाॅस्पिटल कामोठे येथील डॉ रजनी मुल्लापटन डायरेक्टर आणि डॉ उत्तरा देशमुख प्रेसिडेंट ह्या लवकरच करणार आहेत.
या कार्यक्रमात दिव्यांगांची चेकप व फिटनेस डॉ कृतिका गावडे, डॉ रवि बाटोला, डॉ जान्हवी शाहा, डॉ अखिल संन्नी , डॉ दुष्टी सोलंकी, डॉ तृस्टी पुजारी, डॉ ऋतुजा बुडाला, आणि कामोठे टीम .
तसेच उरण तालुका दिव्यांग संस्थेचे श्री महेंद्र म्हात्रे (अध्यक्ष), श्री राजेन्द्र पाटील (उपाध्यक्ष) श्री नितीन कडु, श्री संदेश राजगुरू आणि फिरोज काझी यांनी मोलाचे सहकार्य केले.
अशाच प्रकारे आपल्या तालुक्यात, गावात कोणत्याही प्रकारचे शिबिर मोफत भरवायचे असल्यास कामोठे येथील एम. जी. एम हाॅस्पिटल च्या आॕथोरेटी बरोबर संपर्क करुन चर्चा करून आपल्या भागात परीसरात मोफत शिबिराचे आयोजन करु शकता जेणेकरून गावोगावी प्रच्यार व प्रसार होईल.