प्रतिनिधी – महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा – शिंदखेडा तालुक्यातील
खलाणे मंडळातील अनेक गावांना तलाठी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे. शेतीसंबंधी 7/12 उतारे पीक पाणी संदर्भात लोकांमध्ये जागरूकता नाही. असे अनेक प्रकारच्या समस्या असूनही तलाठी आपल्या सजा कार्यालयात येत नाही .
चिरणे,कदाणे,दरखेडा, बाभूळदे,
महाळपूर पाच सहा गावांना तलाठी येत नाही. अश्या चर्चा गवागावामध्ये होत आहेत. तरी या गोष्टीकडे तहसीलदार साहेब यांनी लक्ष घालून गैरहजर राहणाऱ्या वर व शेतकऱ्यांची गैरसोय करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी व जेणेकरून शेतकरी राजाला त्रास होणार नाही याची काळजी तहसीलदार साहेबांनी घ्यावी अशी चर्चा जनमानसात चालू आहे. ही गोष्ट जर होत नसेल तर जनताच पुढचे पाऊल उचलेल अशीही चर्चा तालुक्यात होताना दिसतेय.