DPT NEWS NETWORK – (भोकर तालुका प्रतिनिधी )
नांदेड: भोकर येथील हदगाव रोडवर दिगंबरराव बिंदू महाविद्यालया समोर धानोरा जाणाऱ्या चौकाचे अहिल्यादेवी होळकर चौक म्हणून नामकरण करण्यात आले.
भोकर हदगाव जाणाऱ्या रोडवर दिगंबरराव बिंदू महाविद्यालयासमोर धानोरा जाणाऱ्या रस्त्यावरील चौकास 8 ऑक्टोबर २०२२ रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नाव देण्यात आले.
धनगर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या नामकरण कार्यक्रमासाठी यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोरावजी शेंडगे, शिवसेनेचे सुभाष नाईक किनीकर, यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले जय मल्हारच्या घोषणाही देण्यात आल्या यावेळी नारायण पा. शेंडगे, खंडेराव शेंडगे, गल्ला.पं. सदस्य राजेश हाके, गोविंद शेंडगे,नीलेश चिकाळकर, खंडू गोरे मारुती वरणे, प्रा, होगे, प्रकाश बोंजीरवाड बालाजी परडे फुलाजी चतुरवाड आदींची उपस्थिती होती.