नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पत्रकारावर दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करुन तो मागे घ्यावा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मागणी!



किनवट, नांदेड : माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर हजर राहत नसल्याने दिनांक ३० सप्टेंबर रोजी ‘माहूर ग्रामीण रुग्णालय सलाईनवर’ व दिनाक ३ ऑक्टोंबर रोजी ग्रामीण रुग्णालयात ‘आरोग्य सेवेची ऐसी तैसी’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती. याचा राग मनात धरून ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉ. निरंजन केशवे यांनी माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने माहूरच्या पुण्यनगरीचे प्रतिनिधी सरफराज दोसानी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ दिनांक ११आक्टोबर रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने तहसीलदार मृणाल जाधव यांची भेट घेऊन माहूर येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. व योग्य चौकशी करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली.
पत्रकारावर गंभीर गुन्हे दाखल करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार पत्रकारांच्या लेखणीवर गंडांतर आणणारा असून लोकहितार्थ बातमी प्रकाशित करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधीची मुस्कटदाबी करणारा आहे.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी आशिष शेळके, राजेश पाटील, आनंद भालेराव, विशाल गिमेकर, शेख अतिफ, नसीर तगाले, सय्यद नदीम, प्रणय कोवे, मारोती देवकते, रमेश परचाके आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद सर्पे, मलिक चौहान, कामराज माडपेल्लीवार, दुर्गादास राठोड, विवेक ओंकार यांनी अन्य एका निवेदाद्वारे तहसिलदार यांना घटनेची पार्श्वभूमी समजाऊन सांगत हा पत्रकारांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा प्रकार असल्याचे सांगितले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:24 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!