नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

किनी येथील वन्यजीव प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, शेतकरी महिलांचा मोर्चा वनविभागाच्या कार्यालयावर धडकला

प्रतिनिधी – सुभाष नाईक
——————
*भोकर*- किनी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणावर वन्यजीव प्राण्याकडुन होत असुन त्या प्राण्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी किनी येथील महिला शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा वनविभाग कार्यालया वर धडकला असुन या संबंधी निवेदनही वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आले.
सध्या शेतकरी अनेक संकटाची सामना करीत आहे.एकीकडे रोज पावसाच्या सुलतानी आक्रमणाने पुरता हैराण असुन यातच तोंडावर आलेल्या पिकांची नासाडी वन्यप्राणी यात रोही,निलगाय रान डुक्कर,वानर आदी प्राणी करत असुन यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे.यामुळे दि १२ऑक्टोबर रोजी किनी येथील महिला संघम शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची नासाडी वन्यप्राणी कडुन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शेतकरी हैराण आहे.हाता तोंडासी आलेले पिक हे जनावर खाऊन टाकत आहेत.यामुळे आधीच निसर्गाच्या लहरी मुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिक रोही, निलगाय, रान डुक्कर वानर व हरीण फस्त करीत असल्याने शेतकरी जगाला तरी कसा असा सवाल करत वनविभागाने या वन्यजीव प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महिला शेतकरी उग्र आंदोलन छेडणार असल्याचे वनविभाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर सरपंच सौ.लक्ष्मीबाई गड्डमवाड, श्रीमती विजयालक्ष्मी करेमगार, सुरेखा आरगेलवाड,सरीता नाईक, सुजाता कोमुलवाड, ज्योती चिंतलपेल्ली,सपना बक्कासाब,सुशीला गुंडमपेल्ली,सौ, गंगाबाई कोतुरवाड,सौ.कविता गोपीडवाड,सौ.विमल ममईवाड,सौ.विजया कुंटलवाड,सौ.भुमाबाई मैदपवाड,नडकुडवाड,सौ निकीता मुस्कुवाड, सौ.सुजाता करेमगार,सविता निघावाड, गंगाबाई मुस्कुवाड ,पेंटाबाई भोकरवाड, खंडेलवाल बाई,मुक्ताबाई गानलावाड,ज्योती गानलावाड, लिंगाबाई नरसापुरे सह शेकडो महिला शेतकरी व गड्डमवाड भुमारेड्डी, शिवसेनेचे सुभाष नाईक,नारायण मुनेश्वर ,कांबळे धम्मपाल आदी होते.
*तहसीलदार यांची भेट*
दिडशे ते दोनशे महिलांनी प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राजेश लांडगे यांची भेट घेऊन पि.एम किसान योजना, शिधापत्रिका,संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना व वन्यजीव प्राण्याकडुन होत असलेली शेतीचे नुकसान आदी योजना विषयी चर्चा केली.यावर प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेश लांडगे यांनी लवकरच यांचा निवाडा गावात येऊन लावणार असल्याचे सांगितले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:14 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!