प्रतिनिधी – अकिल शहा (साक्री)
साक्री : पिंपळनेर येथील दिया आय केअर हॉस्पिटल तर्फे पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांचे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 50 पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंब यांचे नेत्र तपासणी करून घेतली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. नेत्रतज्ञ डॉक्टर मोहसीन शेख, तौफिक शेख, शितल पाटील यांनी तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करून रुग्णांना नेत्रासंबंधीत वैद्यकीय सल्ला देत गरज भासल्यास चष्मा बसवून घेण्याबाबत सल्ला दिला. तसेच ज्या लोकांना नेत्रासंबंधी जास्त अडचण असल्यास त्यांना सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार असल्याचे डॉक्टर मोहसीन शेख यांनी सांगितले पोलीस अमंलदार पि.यू.सोनवणे,पो. हे.काँ.सोमनाथ पाटील,पो.काँ.रविंद्र सूर्यवंशी,पो.काँ.दावल सैंदाणे,एम.पी.शिरसाठ असई गवळी,पिंपळे,अहिरे,आदी यांनी सहकार्य केले.