प्रतिनिधी – महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा : सभापती व उपसभापती निवडीसाठी झालेल्या विशेष सभेस भाजपाच्या वैशाली पाटील, अनिता पवार, छायाबाई गिरासे, नंदीनी कोळी, राजेश पाटील, रणजित गिरासे, वंदना कोळी, पुष्पाबाई रावल, नारायणसिंग गिरासे, दीपक मोरे, प्रवीण मोरे, पंडीत बोरसे, भागबाई भिल, चंद्रकला भिल, दुल्लभ सोनवणे तसेच राष्ट्रवादीचे सदस्य भगवान भिल हे सदस्य उपस्थित होते तर महाविकास आघाडीचे अन्य चार सदस्य अनुपस्थितीत होते. राष्ट्रवादीचे वारुड गणाचे सदस्य भगवान भिल यांनी यावेळी भाजपाला पाठिंबा देत आपण विकासासोबत आहोत असल्याचे सांगितले.
यावेळी जि.प.चे उपाध्यक्ष कामराज निकम, मावळत्या सभापती अनिता राकेश पवार, उपसभापती राजेश पाटील, जि प सदस्य संजीवनी सिसोदे, विरेंद्र गिरासे, महाविरसिंग रावल, पंकज कदम, डी आर पाटील, धनंजय मंगळे, नथा आबा पाटील, माजी सभापती जिजाबराव सोनवणे, नरेंद्र गिरासे, मोतीलाल कोळी, डी एस गिरासे, नगराध्यक्ष अनिल वानखेडे,भरत पवार, माजी नगरसेवक दीपक चौधरी, सुरज देसले, माजी बांधकाम सभापती जितेंद्र गिरासे, माजी उपसभापती अनिल गायकवाड, शहराध्यक्ष प्रवीण माळी, दाऊळ सरपंच कुणाल पवार, साहेबराव गोसावी, कुरकवाडे सरपंच प्रकाश पाटील, कर्ले सरपंच साहेबराव पवार, होळचे माजी सरपंच मनोज पाटील, वारुडचे सरपंच दत्तात्रय दोरीक, देवानंद बोरसे, दसवेलचे माजी सरपंच अनिल पिंपळीसकर, गव्हाणेचे भटु बोरसे, चिलाणेचे अरुण पाटील, मेथी सरपंच रमाकांत बागले, शेवाडे माजी सरपंच बबलू कोळी, दत्ताणे सरपंच राहुल बोरसे, बाजार समिती संचालक सखाराम पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.