DPT NEWS NETWORK 🗞️✍️
बिलोली प्रतिनीधी / शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून ते उपविभागीय कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा प्रहार जनशक्तीपक्ष, प्रहार दिव्यांग संघटना, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद, बिलोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत दिव्यांगाना ५% टक्के निधी तात्काळ वाटप करण्यात यावे. पंचायत समिती येथे धुळखात पडलेले दिव्यांगाचे साहित्य लाभार्थ्यांना तात्काळ वाटप करणे, उपजिल्हा रूग्णालय बिलोली येथे तात्काळ चालू करणे. निराधार, श्रावण बाळ, दिव्यांग लोकांचा पेन्शन निधी महिण्याच्या १ तारखेला खात्यात जमा करण्यात यावे, पंतप्रधान आवास व माता रमाई आंबेडकर आवास योजने अंतर्गत लाभार्यांना मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करण्यात यावे, अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट एकरी १० हजार रूपये अनुदान देण्यात यावे, मुसळधार पावसामुळे शेतकन्यांचे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून एकरी 30 हजार रूपये आर्थीक नुकसान भरपाई देण्यात यावे, बिलोली शहरातील भास्कर नगर, देशमुख नगर व तालुक्यातील गायरान धारकांना पट्टे त्यांच्या नावाने करून घरकुल मंजूर करणे, तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात बायोमॅट्रीक मशीन चालू करणे व सर्व ग्रामसेवक, सर्व तलाठी, सर्व कर्मचारी बिलोली मुख्यालयी राहणे बंधनकारक करा. आणि कुंडलवाडी बिलोली येथील नगर परिषदेस मुख्याधिकारी दर्जाचाच मुख्याधिकारी नेमणूक करणे, बिलोली तालुक्यातील काल खुर्द व सर्व ग्रामीण भागातील ग्राम पंचायत अंतर्गत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे यांच्या सह विविध मागण्या करण्यात आले. मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार नरावाड यानी स्विकारले. उपविभागीय अधिकारी आले नंतर सर्व संघटनाचे प्रतिनिधी ची बैठक घेवुन चर्चा करुन मागण्या वर निर्णय घेवु आसे आश्वासन दिले. या वेळी शेकडो नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संदीप मांजरमकर, प्रशांत गोडबोले, विठ्ठल देशमुख, जमदाडे, श्यामभाऊ कांबळे, शंकर महाजन, धम्मदिप गावन्डे, एजाज पठान, संतोष साळवे, अ. गफुर कुरैशी, पाशाभाई गादीवाले, सय्यद रियाज, विशाल वाघमारे , अनिल सिरसे, गंगाधर इबीतवार, सुभाष आमटे, वाघमारे सिध्दोधन, अलीमा शेख, नजीरसाब, जमील शेख, यादव आमटे आदि उपस्थीत होते.