प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : साक्री तालुक्यात चोरट्याने धुमाकूळ घातला असून साक्री शहरासह परिसरात चोरांची दहशत निर्माण झाली आहे परिसरातील नागरिक दिवाळी सणाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरीचे प्रमाण वाढले आहे, पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवून ही चोर ही सापडत नाही आणि चोरीचे प्रमाण कमी होत नाही यामुळे नागरिकांनी पोलिसांनी या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
साक्री शहरातील मेघराज गोकुळ मोहने वय ४७ व्यवसाय शेती अंबापुर रोड अहिंसा नगर येथे त्यांचे घर आहे त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगी राहत असते ते दिनांक ३०ऑक्टोबर २०२२ रोजी घोटाने जिल्हा नंदुरबार या गावी त्यांच्या सासरवाडीला परिवारासह गेले होते बंद घर असल्याचा या चोरांनी फायदा घेऊन घरात चोरी झाल्याची घटना दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी नऊ वाजता निदर्शनास आली आहे या घटनेची माहिती त्यांच्या शेजारीन यांनी त्यांना संपर्क साधून दिली त्यांनी ताबडतोब सकाळी ११ वाजता त्यांच्या घरी पोहचून शहानिशा केली असता त्यांच्या घरातून २०००० किमतीची चार ग्रॅमची सोन्याची अंगठी, १७ हजार रुपये किमतीची साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, ४०,००० किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तोंगल, १५,००० किमतीचे चांदीचे हातापायातले कडे व गळ्यातील चैन असा एकूण १ लाख २२हजार किमतीचा मुद्देमाल घरातून चोरी झाली असून अज्ञात चोराविरुद्ध मेघराज मोरे यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोराविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.काँ.सपकाळे करीत आहेत.