DPT NEWS -प्रतिनिधी – अकिल शहा
*साक्री :* कोणतेही शासकीय रुग्णालय नेहमी तेथे येणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार देत चांगली सुविधा पुरविन्याचा प्रयत्न करतात. पण त्या शासकीय रुणालयाची अवस्था बघता. याच रुग्णालयाला उपचाराची गरज आहे असे वाटत असते.
जेव्हा एखादे केंद्रीय पथक रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी येत असल्याची चाहुल लागताच त्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी खडबडून जागे होतात. तसाच प्रकार साक्री ग्रामीण रुणालय होत आहे. केंद्रीय कमिटीचे पथक ११ नोव्हेंबर२०२२रोजी पाहणीसाठी येत असल्याने साक्री ग्रामीण रुणालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी स्वखर्चाने रुग्णालयात साफसफाई, नवीन बेड, नवे गाद्या. इमारतीला रंगकाम व इतर कामे करत आहेत. स्वखर्चाने जर कर्मचारी रुग्णालयाची रंगरंगोटी करत आहे. तेव्हा असा प्रश्न पडतो की रुग्णालयाच्या दुरूस्ती साठी. रंगकाम करण्यासाठी रुग्णालया प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसावा. म्हणुन वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कडुन पैसे घेवुन केंद्रीय पथकासमोर रुग्णालयाचा “देखावा” सादर करण्यात येणार आहे. की आणखी काही “गौडबंगाल” आहे हा प्रश्न एखाद्या सामान्य नागरिकाला पडल्या शिवाय राहणार नाही. ते काही असो केंद्रीय पथकाच्या पाहणीमुळे साक्री ग्रामीण रुणालय एखाद्या खाजगी रुग्णालयाच्या सारखे “चका चक” दिसेल जेवढे खरे. शेवटी या सर्व प्रकारामुळे असे वाटते की केंद्रीय पथकाच्या टिमने वर्षातुन दोनवेळा तरी रुग्णालयांची पाहणी करावी. जेणे करुन त्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार व सुविधा मिळु शकेल.