DPT NEWS NETWORK ✍️
प्रतिनिधी- अकील शहा
साक्री : महाराष्ट्रात बरेच अपघाताच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. असीच एक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात 2016 साली घडली होती.
त्यावेळी फिर्यादी हटेसिंह गजेसिंह गिरासे यांना दूरध्वनी द्वारे कळले की त्यांचे जावई नंदुरबार होऊन मोटरसायकल ने निजामपूर कडे येत असताना त्यांना मुकेश पोपट चौधरी यांच्या स्विफ्ट डिझायर गाडी क्र. MH.18.AL.6190 या
गाडीने जोरात कट मारल्यामुळे त्यांच्या जावयाला मुक्का मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते.
अशा अपघाताची फिर्याद तत्कालीन तपासी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.एन. कोकणी यांनी नोंदवलेली होती. व सदर केस तपासाअंती दोषारोपपत्र साक्री न्यायालयात दाखल केले. सदर खटल्यात सर्व साक्षीदारांचे तपास व उलट तपास न्यायालयात नोंदवल्या नंतर सहाय्यक सरकारी वकील ॲड अतुल जाधव यांनी प्रखर युक्तिवाद करत सरकार पक्षाची बाजू मोठ्या कौशल्याने मांडली. सदर खटल्याच्या सुनावणीअंती आरोपीच्या वाहनाचा क्रमांक साक्षीदारांच्या जबाबात निष्पन्न झाल्याने आरोपीस दोषी घोषित करून मा. साक्री न्यायालयाने भा. द. वि चे कलम 279 प्रमाणे न्यायालय उठेपावेतो व 1000 रू. दंड, भा. द. वि चे कलम 337 प्रमाणे न्यायालय उठेपावेतो व 500 रू. दंड, भा. द. वि चे कलम 338 प्रमाणे न्यायालय उठेपावतो व 1000 रू. दंड, तसेच मो.वा. कायदा चे कलम 184 प्रमाणे 1000 रू. दंड, मो. वा. कायदा चे कलम 134/177 प्रमाणे 100 रू. दंड अशी शिक्षा सुनावत दंडाची पूर्तता न केल्यास दहा दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा जाहीर करण्यात आली.
सदर खटल्याचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी पो.हे.कॉ. आर. एन. कोकणी यांनी पाहिले व न्यायालयीन कामकाज सरकार पक्ष तर्फे सहाय्यक सरकारी वकील अतुल जाधव यांनी वरिष्ठ न्यायालयाच्या न्याय निर्णयाचा हवाला देत युक्तिवाद केला. साक्री न्यायालयाच्या या निकालामुळे बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या चालकांमध्ये मध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.