नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ३ गावठी पिस्टल, ६ मॅकझीनसह तब्बल ३० जिवंत काडतुसे जप्त करीत २ आरोपीना केले जेरबंद

DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले पुणे


पुणे : स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर साहेब यांच्या आदेशाने खेड राजगुरुनगर या परिसरात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना सदर पथकाला गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, दोन इसम काळया रंगाचे बुलेट गाडीवरून शिरोली बाजूकडून किवळे जात असून त्यांचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल असल्याचे समजले सदर बातमीची खात्री करून घेण्यासाठी त्याठिकाणी जाऊन बुलेट गाडीवरील २ इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे
१) आकाश आण्णा भोकसे वय २३ वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे २) महेश बाबाजी नलावडे वय २३ वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे असे सांगीतले तसेच त्यांची अंगझडती घेतली असता आकाश याचे कंबरेला खोचलेला दोन्ही बाजूस २ लोंखडी गावठी पिस्टल मॅकझीन सह मिळून आले तसेच त्याचे पॅन्ट च्या खिशात २ मॅकजीन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आल्या. तसेच त्याचा मित्र महेश याचे याचे कंबरेला १ गावठी पिस्टल मॅकझीन सह मिळून आले व त्याचे पॅन्ट च्या खिशात १ जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली . सदरील दोन्ही ईसमंकडून ३ गावठी पिस्टल आणि ३मॅकझीन प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेल्या आणि पिस्टल मधे प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेली अवस्थेत मिळून आली १) आकाश अण्णा भोकसे वय २३ वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे २) महेश बाबाजी नलावडे वय २३ वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे यांचे ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) एक लोखंडी गावठी पिस्टल मॅकझिन सह काळया रंगाचे. किंमत. अंदाजे . रूपये = ३५,०००
२) एक लोखंडी गावठी पिस्टल मॅकझीन सह काळया रंगाचे.किमत. अंदाजे . रूपये = ३५,०००
३) एक लोखंडी गावठी पिस्टल मॅकझीन सह सिल्वर रंगाचे. किंमत. अंदाजे. रूपये= ३५,०००
४) ३० जिवंत काडतुसे किंमत अंदाजे रूपये = ३०००
५) एक काळया रंगाची नंबर नसलेली बुलेट मोटारसायकल किंमत अंदाजे रूपये ५०,०००
६)३ रिकाम्या मॅकझीन किंमत अंदाजे रूपये =३०००
असा एकूण १ लाख ६१ हजार रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील आरोपी यांचे विरूद्ध सरकारतर्फे फिर्याद देऊन आर्म ॲक्ट ३, २५ नुसार खेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदरील आरोपी यांना मुद्देमाल सह पुढील तपास कामी खेड पोलीस स्टेशन चे ताब्यात दिले आहे.
सदरील कारवाई ही मा पोलीस अधिक्षक सो श्री अंकित गोयल सो
अप्पर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे सो
पोलीस उपअधीक्षक श्री सुदर्शन पाटील सो
यांचे मार्गद्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर सो
स पो नी नेताजी गंधारे
पो स ई शिवाजी ननवरे
पो स ई गणेश जगदाळे
पो हवा विक्रमसिंह तापकीर
पो हवा विजय कांचन
पो ना अमोल शेडगे
पो ना बाळासाहेब खडके
पो शि धिरज जाधव
पो शि निलेश सुपेकर
पो शि दगडू वीरकर यांचे पथकाने केली आहे

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:43 am, January 14, 2025
temperature icon 19°C
साफ आकाश
Humidity 43 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!