DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – प्रभू तडवी
अक्कलकुवा :- अक्कलकुवा तालुक्यातील वालांब(का) येथे ” माझा एक दिवस माझ्या बळी राज्यासाठी” या उपक्रमांतर्गत श्री मोहनजी वाघ सर विभागिय कृषि सह संचालक, नाशिक विभाग नाशिक, यांनी उपस्थित बळीराज्यासाठी कृषि विषयक व कृषि पुरक अडीअडचणी तसेच इतर समस्या जाणून घेतल्या. विशेषता हंगामातील बियाणे, खते उपलब्धता, पिक विमा, हवामान आधारीत फळपिक विमा , स्ट्रॅबेरी लागवड तंत्रज्ञान क्षेत्र विस्तार कार्यक्रम, बाजारभाव , सेंद्रिय निविष्ठा वापर करून दर्जेदार मोलाचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले. तसेच पौष्टीक तृणधान्य वर्ष 2022-23 साजरा करणे , पिक स्पर्धा , किसान कार्ड , क्रॉप म्युझियम ई पिक पहाणी, फळबाग लागवड , 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन साजरा करणे , महाडीबीटी अंतर्गत 100 % ऑनलाईन अर्ज भरणे, PMFME मध्ये बँक मार्फत कृषि पुरक व्यवसायाचे प्रकरणे मंजूर करणे इत्यादी योजनांवर सविस्तर चर्चा केली. सदर कार्यक्रमासाठी सरपंच श्री आकाश धनसिंग वसावे , पं.स सदस्य माजी श्री धनसिंग रुपसिंग वसावे, प्रगतशील स्ट्रॅबेरी उत्पादक शेतकरी, धिरसिंग, टेडया, जहाऱ्या, ठाणसिंग, दिलीप. उपस्थित होते.तसेच कार्यक्रमास श्री निलेश गडरी तालुका कृषि अधिकारी, श्री किरण पाडवी व इतर कर्मचारी उपस्थित होते.